| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Feb 25, 2013 - 06:00:30 AM |
Title - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मास्टर प्लॅनला मिळाली मंजुरीPosted by : riteshexpert on Feb 25, 2013 - 06:00:30 AM |
|
|
सोलापूर - रेल्वे स्थानकमधील आरक्षण केंद्रासमोर तिकीट काढण्यासाठी होत असलेल्या रांगा, वाहने आत आणताना प्रवाशांची होणारी दमछाक, तिकिटासाठी होणारी हुज्जत असे प्रकार सोलापूर रेल्वे स्थानकात सध्या घडत असले तरी भविष्यात मात्र असे चित्र दिसणार नाही. कारण, सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूरकरांची भविष्यातील गरज ओळखून पुढील वीस वर्षांचा आराखडा तयार केला आहे. सोलापूर रेल्वे विभाग व्यवस्थापक ए. के. प्रसाद यांनी त्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. |