Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 13, 2013 - 06:00:37 AM


Title - मुंबई-सिकंदराबाददरम्यान जुलैत सहा जादा गाड्या
Posted by : nikhilndls on Jul 13, 2013 - 06:00:37 AM

पुणे- मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाददरम्यान जुलै महिन्यात सहा जादा वेगवान गाड्या पुणेमार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

टिळक टर्मिनसवरून दर सोमवारी म्हणजेच 14, 21 व 28 जुलै रोजी रात्री आठ वाजून 50 मिनिटांनी ही गाडी सुटेल. ती मध्यरात्री म्हणजे मंगळवारी पहाटे 12 वाजून 55 मिनिटांनी पुण्यात पोचेल. तेथून 10 मिनिटांनी सिकंदराबादला रवाना होऊन दुपारी तीन वाजता पोचेल. सिकंदराबादहून दर रविवारी म्हणजेच 15, 22 व 29 जुलै रोजी रात्री पावणेबारा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी ती पुण्यात पोचेल व सायंकाळी साडेचार वाजता टिळक टर्मिनसवर पोचेल.

कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, वाडी, सेरम, तंदूर, विक्राबाद व बेगमपेठ आदी स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. प्रथमवर्ग वातानुकूलनचा एक, द्वितीय वातानुकूलनाचे दोन, आठ तृतीय वातानुकूलनसह एकूण 14 डबे असतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी केले आहे.