Indian Railways News => Topic started by puneetmafia on Feb 25, 2013 - 12:00:28 PM


Title - नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेला भगदाड-नाशिक + उ. महाराष्ट्र-महाराष्ट्र-Maharashtra Times
Posted by : puneetmafia on Feb 25, 2013 - 12:00:28 PM

नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेला भगदाड Feb 25, 2013, 12.00AM IST   आर्टिकल प्रतिक्रिया

0

म . टा . प्रतिनिधी , नाशिकरोड

मध्य रेल्वेचे नाशिकरोड स्थानक प्रमुख रेल्वे स्थानक असूनही सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याने प्रवाशांची अन् स्थानकाची सुरक्षा नक्की कोणाच्या हाती आहे , याबाबत प्रश्न निर्माण होतो . मेटल डिटेक्टर बंद असून रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वाराशिवाय असंख्य रस्ते असल्याने रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेला भगदाड पडले आहे . याकडे सुरक्षा यंत्रणेने व स्थानक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसते .

नाशिकवर असलेले दहशतवादाचे सावट रेल्वे स्थानकावरील सुरक्षा रक्षकांनी झुगाले असल्याचा अनुभव रेल्वे स्थानकावर फेरफटका मारताना येतो . रेल्वे स्थानकात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची तपासणी होत नाही . फलाटावर जाताना तपासणीसाठी लावलेले मेटल डिटेक्टर बंद पडलेले आहेत . तेथे एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नाही . तर स्थानकावर प्रवेश करण्यासाठी असंख्य असे रस्ते आहेत . स्थानकावर प्रवेश करण्यासाठी कुणीही अटकाव करु शकत नाही असी परिस्थिती आहे . हैद्रबादमध्ये झालेला बॉबस्फोट हा सायकलच्या सहाय्याने करण्यात आला होता . सायकलच्या माध्यमातून सहज बॉम्ब स्फोट होत असेल , तर नाशिकरोड स्थानकावर असंख्य मोटारसायकली आणि दुचाकी गाड्या बेवारस स्थितीत उभ्या आहेत . बेवारस वाहनांच्या माध्यमातून स्फोट घडवायचा झाल्यास सहज नाशिकरोडचे स्थानक लक्ष होऊ शकते . नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे कॉलनीतून येण्यासाठी मार्ग आहे , या मार्गावरुन कुणाचेही लक्ष नसते . अनेक विनातिकीट प्रवास करणारे या मार्गाचा अवलंब करतात अनेक व्यापारी या मार्गावरुन मालाची ने आण करतात . याच मार्गावर चोरांना पळून जाण्यास अनेक मार्ग आहेत . त्याचप्रमाणे सिन्नर फाट्याकरुन येणारा मार्ग मोकळा आहे , तसेच गोरेवाडीकडून कुणालाही येता येते . या स्थानकावर काही दिवसांपूर्वी बॅग स्कॅनर लावण्यात आले होते ; परंतु अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला भेट देऊनही हे स्कॅनर दुरुस्त करण्यात आले नाही . तर दुरूस्तीनंतरही त्याचा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे . एका पडक्या खोलीत ४५ पोलीस आपला कारभार चालवित आहेत .

वाहनांची व्यवस्थाच नाही ...

नाशिकरोड रेल्वे पोलिसांकडे घोटीपर्यंत हद्द आहे ; परंतु एखादी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी जाण्यासाठी तसेच पोलिसांकडे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्थाच नाही . त्यामुळे त्यांना एकतर खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो किंवा त्यावेळी येणाऱ्या रेल्वेची वाट पहावी लागते . त्याकरता रेल्वे पोलिसांना वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे .