Indian Railways News => Topic started by greatindian on Feb 25, 2013 - 00:00:27 AM


Title - Pune-Amravati Express from Feb.24
Posted by : greatindian on Feb 25, 2013 - 00:00:27 AM

पुणे-अमरावती एक्स्प्रेस आजपासून

'बजेट'पूर्वीच अमरावतीला नजराणा

अमरावती। दि. २३ (स्थानिक प्रतिनिधी)

मागील रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरात आणि बहुप्रतीक्षेत पुणे-अमरावती एक्स्प्रेस उद्या २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. माजी रेल्वेमंत्री खा. सुरेश कलमाडी हे पुणे रेल्वेस्थानकाहून या गाडीला रात्री १0 वाजता हिरवी झेंडी दाखवून अमरावतीकडे रवाना करतील.
पुण्याकरिता थेट रेल्वेगाडी असावी ही अनेक वर्षापासूनची अमरावतीकरांची मागणी होती. १७ तासाचा प्रवास गाठून ही गाडी (क्रमांक ११४0५) अमरावतीला पोहोचेल. पुणे येथून शनिवार, रविवार तर अमरावतीहून सोमवार, शनिवार अशी ही गाडी धावणार आहे.
पुणे येथून रात्री १0 वाजता सुटल्यानंतर ही गाडी दौंड येथे ११.0५, खुर्दवाडी रात्री १.0५, उस्मानाबाद २.२५, लातूर रोड सकाळी ५.१0, परभणी ८.१५, पूर्णा ९, अकोला दुपारी १.१५, बडनेरा २.२५ तर अमरावतीला ३ वाजता पोहोचेल.

अमरावती येथून सायंकाळी ६.३0 वाजता सुटेल. बडनेरा येथे ६.५0, अकोला ८.२५, पूर्णा रात्री १२.३0, परभणी १ वाजता, लातूर सकाळी ५.३0, उस्मानाबाद ७.५५, कुर्दवाडी ९.४0, दौंड ११.४0 तर पुणे येथे १.१५ मिनिटाने पोहोचेल. ही गाडी १६ डब्यांची असून रेल्वे संगणकात आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. उद्या २४ फेब्रुवारी रोजी पुण्याहून ही गाडी सुटून दुसर्‍या दिवशी २५ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पोहोचेल.

पहिल्यांदाच ही गाडी अमरावती रेल्वेस्थानकावर येत असल्याने खा. आनंदराव अडसूळ, आ. रावसाहेब शेखावत, रेल्वे यात्री महासंघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा आदी स्वागत करणार आहेत.