Indian Railways News => Topic started by messanger on Jul 11, 2013 - 18:00:19 PM


Title - 'पोलिसगिरी' वर रेल्वेचा बडगा
Posted by : messanger on Jul 11, 2013 - 18:00:19 PM

मुंबई

आपल्या ' पोलिसगिरी ' चा वापर करून गर्दीच्या वेळी अपंगांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या पोलिसांवर रेल्वेने शिस्तीचा बडगा उगारला आहे. पश्चिम आणि मध्ये रेल्वेच्या अपंगांसाठीच्या डब्यात प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत अशा ३७ पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

अपंगांसाठीच्या डब्यात इतर प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्याच्या , तसेच पोलिसांच्या दंडेलीबद्दलच्या तक्रारी हाती आल्यानंतर रेल्वेने ही कारवाई सुरू केली. त्यात मध्य रेल्वेवर १ ते ९ जुलैपर्यंत ९८७ तर पश्चिम रेल्वेवर २९ जून ते ९ जुलै कालावधीत १०६९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या चुकार प्रवाशांमध्ये ३७ शहर पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे पोलिसांच्या बेमुर्वतखोरीला काही प्रमाणात आळा बसू शकणार आहे.