Indian Railways News => | Topic started by nikhilndls on May 13, 2012 - 00:00:31 AM |
Title - ऑनलाइन तिकिटाचा परतावा 15 दिवसांतPosted by : nikhilndls on May 13, 2012 - 00:00:31 AM |
|
मुंबई - रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण रद्द केल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे मिळण्यासाठी बरेच दिवस जातात. हा विलंब टाळण्यासाठी मध्य रेल्वेने "ऍडव्हान्स कोचिंग रिफंड सिस्टिम' (एसीआरएस) सुरू केली. या प्रणालीचा प्रवाशांना फायदा होईल, असे सांगितले जाते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) सर्व्हरवरील ऑनलाइन आरक्षणाचा तपशील "एसीआरएस' यंत्रणेवर अपलोड होईल. सीएसटी येथील मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकाला तो "डेटा' उपलब्ध होईल. त्यामुळे पैसे परत करण्याचे काम अधिक जलद होईल, असे मध्य रेल्वेने सांगितले. |