Indian Railways News => | Topic started by RailXpert on Apr 21, 2012 - 21:54:27 PM |
Title - -नाहूर रेल्वे अपघाताची चौकशी सुरूPosted by : RailXpert on Apr 21, 2012 - 21:54:27 PM |
|
मुंबई - मध्य रेल्वेवर मुलुंड आणि नाहूर स्थानकांदरम्यान काल (ता. 19) रुळाशेजारच्या खांबावर आदळून लोकलमधील तीन प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 25 जण जखमी झाले. या अपघाताला जबाबदार असलेले रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध "जीआरपी'ने (गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस) सुरू केला आहे. तेथील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे मागितली आहेत. |