Indian Railways News => Topic started by puneetmafia on Aug 09, 2012 - 04:20:08 AM


Title - रेल्वेपेक्षा प्लॅटफार्म तिकीट महागले
Posted by : puneetmafia on Aug 09, 2012 - 04:20:08 AM

रेल्वेपेक्षा प्लॅटफार्म तिकीट दुप्पट महाग! हे वाचून बुचकळ्यात पडले असाल ना! मात्र हे सत्य आहे. कारण सर्वांत श्रीमंत विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या रेल्वे विभागाचा कारभारही अजब आहे. गोंदियाजवळील स्थानकाच्या रेल्वे तिकिटापेक्षा प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर दुप्पट आहेत. त्यामुळे अनेक जण प्लॅटफार्मपेक्षा दोन रुपयाचे रेल्वेचे तिकीट काढत असल्याचे वास्तव आज गोंदिया रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे.

रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि मस्त असाच आहे. त्यामुळे लांब असो वा जवळ सारेच हा पर्याय जवळ करतात. गोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील महत्त्वाचे असल्याने हजारो लोक येथून प्रवास करतात. नातेवाईकांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी किंवा भेटण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या आत गेले असता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. गोंदिया रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत मागील वर्षी 3 रुपये होती. त्यात आणखी वाढ करून आता ५ रुपये करण्यात आले आहे. ही तिकीट २ तासांसाठी वैध आहे. मात्र , गोंदियाच्या जवळील रेल्वे स्थानकाची तिकीट त्याच्यापेक्षाही कमी आहे. गोंदियापासून नागराधाम स्थानकाची तिकीट फक्त २ रुपये असून ती तिकीट ६ तासांसाठी वैध आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर मार्गावरील गोंदिया-गणखैरा मार्गाचे तिकीटही फक्त २ रुपये आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याऐवजी रेल्वे स्थानक तिकीटाचा पर्याय स्वीकारला आहे.