Indian Railways News => Topic started by Mafia on Aug 09, 2012 - 09:00:46 AM


Title - मध्य रेल्वेच्या ६ स्टेशनांवर ७८४ सीसीटीव्हींची नजर-----मुंबई
Posted by : Mafia on Aug 09, 2012 - 09:00:46 AM

मुंबई

पश्चिम रेल्वे स्टेशनप्रमाणे आता मध्य रेल्वे स्टेशनवरही अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील . सीएसटी , दादर , कुर्ला , कुर्ला टर्मिनस , ठाणे आणि कल्याण या ६ प्रमुख स्टेशनांवर ७८४ सीसीटीव्ही कॅमे ‍ ऱ्यांची कडवी नजर फिरणार असून ते पुरवणाऱ्या ' नेल्को ' कंपनीने जागांचा सर्व्हेही केला आहे . हे कॅमेरे बसवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे .

रेल्वे स्टेशनवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर स्टेशनांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला . त्यामुळे प्रमुख स्टेशनांवर ' इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम ' ( आयएसएस ) कार्यान्वित करण्याची कल्पना मांडण्यात आली . आता ही योजना प्रत्यक्षात येणार आहे . स्टेशन ​ बिल्डिंगमध्ये तसेच रेल्वे यार्डामध्येही सीसीटीव्ही असतील . हे कॅमेरे ' रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ' ( आरडीएसओ ) च्या दर्जाप्रमाणे असतील . शिवाय , डिजिटल असल्याने उत्तम दर्जाचे शूटिंग मिळवता येईल .

बॉम्बशोधकांची सामुग्री मिळणार ...

या कंत्राटात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बॉम्बचा तपास करणारे बॅग स्कॅनर , गाड्यांची तपासणी करणारे स्कॅनरही पुरवले जाणार आहेत . त्यात ११ बॅग स्कॅनर , आठ गाड्यांचे स्कॅनर , दोन पोर्टेबल स्कॅनर , ८५ मेटल डोअर डिटेक्टर , ४२६ हँड मेटल डिटेक्टरचा समावेश आहे .

सीएसटीः १३० कॅमेरे असून तिथे नवेकोरे २१४ कॅमेरे लागतील .

दादरः ३१ कॅमेऱ्यांची जागा १२० कॅमेरे घेतील .

कुर्लाः ३२ कॅमेरे असून ४६ कॅमेरे लागतील .

कुर्ला टर्मिनसः ३६ कॅमेरे असून तिथे २०० कॅमेरे बसतील .

ठाणेः ४० कॅमेऱ्यांची जागा ११४ कॅमेरे घेतील .

कल्याणः जुन्या ५० ऐवजी ९० कॅमेरे लागतील .