Indian Railways News => Topic started by nikhilndls on Aug 30, 2012 - 04:00:05 AM


Title - एलिव्हेटेड 'एसी' लोकल आठ डब्यांची-----मुंबई
Posted by : nikhilndls on Aug 30, 2012 - 04:00:05 AM

मुंबई ,

ओव्हल मैदान ते विरार अशा एलिव्हेटेड रेल्वेचे डबे पंधरावरून आठ करण्यात येणार असून जागेची अडचण , कमी लांबीचे प्लॅटफॉम या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे . डबे कमी , फेऱ्या जादा या सूत्रानुसार दोन मिनिटास एक अशा तासाभरात तीस ' एसी ' लोकल सुटणार आहेत .

एलिव्हेटेड लोकल प्रकल्प सन २०१९मध्ये प्रत्यक्षात येणार आहे . त्यासाठी पंधरा डब्यांच्या गाड्यांचा प्रस्ताव होता . परंतु , प्रकल्पातील जमीन अधिग्रहण , हस्तांतरण या प्रश्नांचा विचार करून ' मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन ' ने ( एमआरव्हीसी ) डब्यांच्या संख्या आठवर आणण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र , ही कमतरता भरून काढण्यासाठी जादा लोकलची जोड देण्यात येणार आहे . डब्यांची संख्या कमी केली असली तरी फेऱ्या वाढल्याने प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी होणार नसल्याचे ' एमआरव्हीसी ' च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे .

...

प्रकल्पासाठी २५ हेक्टर जमीन

एलिव्हेटेड रल्वे प्रकल्पासाठी ' एमआरव्हीसी ' सुमारे २५ हेक्टर जमीन अधिग्रहित करणार असून त्यापैकी १० हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे . सुमारे २१ हजार कोटींच्या या प्रकल्पातून महसूल मिळवण्याच्या उद्देशाने काही स्टेशन परिसरात बहुमजली इमारती बनवण्याचा विचार आहे .