Indian Railways News => Topic started by chotelal on Jul 29, 2013 - 15:59:51 PM


Title - पनवेल-सीएसटी काहीकाळ ठप्प - मुंबई
Posted by : chotelal on Jul 29, 2013 - 15:59:51 PM

मुंबई

हार्बर मार्गावर पनवेलहून सीएसटीकडे जाणा-या एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने पनवेल-सीएसटी मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

पनवेलहून सीएसटीकडे जाणा-या एका लोकलमध्ये रे-रोड-डॉकयार्ड स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे सीएसटीकडे जाणारे चाकरमानी प्रवासी संतापले. बिघडलेल्या लोकलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून लवकरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.