Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 28, 2013 - 21:01:22 PM


Title - दरड कोसळली... दुरांतो अडली-
Posted by : puneetmafia on Jun 28, 2013 - 21:01:22 PM

पुणे

निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनवर शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे कळते. मात्र दरड कोसळून माती आणि दगड रेल्वे रुळावर आल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणा-या रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

शुक्रवारी सकाळी मंकी हिलजवळील रेल्वेमार्गावर दरड कोसळून माती आणि दगड रेल्वेमार्गावर आले. यावेळी तेथून जाणा-या निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनावर देखील ही माती आली. मात्र दुरांतोच्या इंजिनाला मोठा फटका बसला नाही. एक्सप्रेस तत्काळ थांबवण्यात आली. या घटनेनंतर सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती रेल्वेप्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र दरड कोसळून रेल्वेमार्गावर आलेली माती हटवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे मार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणा-या गाड्यामात्र सुरळीत आहेत, अशी माहिती मिळते.