Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jul 17, 2012 - 12:00:23 PM


Title - AMARAVATI NARAKHER RAILWAY
Posted by : ConfirmTicket on Jul 17, 2012 - 12:00:23 PM

नरखेड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी १0२ कोटींची मागणी

अमरावती।दि. १६ (स्थानिक प्रतिनिधी)
बहुप्रतीक्षित अमरावती-नरखेड रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आला आहे.मात्र या मार्गाच्या लोकार्पणप्रसंगी १0२ कोटीच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात यावा, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
रेल्वेमंत्री मुकुल रॉय व रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे खासदार अडसूळ यांनी पाठविलेल्या पत्रानुसार अमरावती-नरखेड हा रेल्वेमार्ग १३८किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे.या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास दक्षिण मध्यरेल्वेची वाहतूक या मार्गाने त्यांना सोईचे होईल, असे खासदार अडसूळ यांचे म्हणणे आहे.
नरखेड रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी १0२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या मार्गाच्या लोकार्पणप्रसंगी विद्युतीकरणाचे भूमिपूजन करून पश्‍चिम विदर्भातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.नरखेड रेल्वेमार्गावरून अकोला, पूर्णा रेल्वेमार्गाने धावणार्‍या व मुंबई-हावडा लोहमार्गावरून नागपूरमार्गेदिल्लीकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या बडनेरा-अमरावती-नरखेडमार्गेवळविण्यासाठी विद्युत इंजिन काढून डिझेल इंजिनद्वारे नरखेडपर्यंत न्यावे लागतील व नरखेड येथून विद्युत इंजिनद्वारे दिल्लीकडे या गाड्या सोडाव्या लागतील. हा सर्व प्रकारे रेल्वे प्रशासनाला गैरसोयीचा आहे.