Indian Railways News => | Topic started by RailXpert on May 15, 2012 - 21:00:30 PM |
Title - सीएसटी-पनवेल ४५ मिनिटांतPosted by : RailXpert on May 15, 2012 - 21:00:30 PM |
|
सीएसटी ते पनवेल अवघ्या ४५ मिनिटांत पोहोचण्याचे स्वप्न मुंबैकरांनी बाळगण्यास हरकत नाही! हा स्वप्नवत वाटणारा प्रवास चक्क 'एसी' लोकलमधून घडवून आणण्याचा प्रस्ताव एक पाऊल पुढे सरकला आहे. 'सीएसटी ते पनवेल हायस्पीड एलिव्हेटेड प्रकल्प' उभारण्यासाठी नेमलेल्या आर्थिक समितीच्या अहवालात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सन २०१८पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने सुमारे ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. |