| Indian Railways News => | Topic started by ConfirmTicket on Jun 01, 2013 - 06:00:06 AM |
Title - मडुरा रेल्वे टर्मिनससाठी भूसंपादन सुरूPosted by : ConfirmTicket on Jun 01, 2013 - 06:00:06 AM |
|
|
बांदा – मडुरा रेल्वे स्टेशन येथील कोकण रेल्वेच्या प्रस्तावित टर्मिनस प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन प्रक्रियेस मंगळवारी सकाळी भूमिपुत्रांच्या सहमतीने प्रारंभ करण्यात आला. भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्यक्रम देतानाच त्यांच्या संपादित करण्यात येणा-या जमिनीला बाजारभावाप्रमाणे दर मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. याबाबत खासदार डॉ. निलेश राणे यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करून ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजू परब यांची भूमिका निर्णायक ठरली. कोकण रेल्वे मार्गावर मडुरा येथे टर्मिनस मार्गी लावून भविष्यातील मडुरा दशक्रोशी औद्योगिक विकासाच्या वाटेवर आणणा-या उद्योगमंत्री नारायण राणे, खा. डॉ. निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी भूमिपुत्र, ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. मळगाव येथील स्थानिक भूमिपुत्रांनी कोकण रेल्वे प्रकल्प, सावंतवाडी-आरोंदा राज्यमार्ग, झाराप-पत्रादेवी बायपास यासाठी मळगाव गावात हजारो एकर जमीन संपादन करण्यात आल्याने टर्मिनस प्रकल्प मळगाव गावाऐवजी अन्य ठिकाणी करण्यात यावा, अशी विनंतीवजा मागणी नारायण राणे व खासदार डॉ. निलेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील शेवटचे स्थानक असलेल्या मडुरा येथे टर्मिनस प्रकल्प उभारण्याचे पालकमंत्री राणे यांनी जाहीर केले. मात्र असे असतानाही सावंतवाडी स्थानकात सर्व गाड्यांना थांबा मिळेल यासाठी प्रयत्न करू, असेही आश्वासनही दिले होते. मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास सावंतवाडी भूमी अभिलेख उपअधीक्षक पी. एस. कदम सहका-यांसमवेत स्टेशन परिसरात दाखल झाले. भूमिपुत्र व संघर्ष समिती पदाधिका-यांनी या वेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र सव्र्हे करण्याव्यतिरिक्त आपल्या मागण्यांसंदर्भात आपण काही करू शकत नाही. आपण आपल्या तक्रारी, मागण्या संबंधित विभागाकडे सादर करा. जमीनधारकांची सहमती असल्यास आपण सव्र्हेला सुरुवात करतो, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रीय कॉँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजू परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भूमिपुत्रांच्या तक्रारी व मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर संजू परब यांनी खा. डॉ. निलेश राणे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत भूमिपुत्रांच्या तक्रारी व मागण्या याबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वे संघर्ष समिती पदाधिकारी सुरेश गावडे व शांताराम गावडे यांची खा. डॉ. निलेश राणे यांच्याशी संजू परब यांनी चर्चा घडवून आणली. भूमिपुत्रांच्या मागण्यांबाबत येत्या आठ दिवसात संघर्ष समिती पदाधिकारी, भूमिपुत्र प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रसाद तायल यांच्याबरोबर आयोजित करण्याचे आश्वासन यावेळी खा. डॉ. राणे यांनी दिले. भूमिपुत्रांच्या मागण्यांबाबत स्वत: पाठपुरावा करू, असे सांगतानाच रेल्वे प्रशासनाने अन्याय केल्यास भूमिपुत्रांसमवेत वेळप्रसंगी ट्रॅकवर उतरण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. खा. डॉ. निलेश राणे यांच्या आश्वासनाअंती भूमिपुत्रांच्या सहकार्याने सव्र्हेला सुरुवात झाली. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रसाद तायल यांनी सोमवारी रात्री उशिरा मडुरा रेल्वे टर्मिनसची जागा व कोकण रेल्वे मार्गावरील दरडींची पाहणी केली. टर्मिनस प्रश्न आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर तायल यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी हे टर्मिनस लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. |