Indian Railways News => Topic started by RailXpert on Feb 01, 2013 - 03:00:04 AM


Title - गुलबग्र्यात तिकीट आरक्षण कार्यालयावर धाड
Posted by : RailXpert on Feb 01, 2013 - 03:00:04 AM

जप्त केलेल्या आरक्षित तिकिटांचे मूल्य १६,२५0 आहे. त्यांच्याकडून ७ हजार ३९0 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सोलापूर। दि. ३0 (प्रतिनिधी)
रेल्वे आरक्षण केंद्रावर अनधिकृत एजंटांद्वारे रेल्वेचे आरक्षित तिकीट काढणे, तिकिटांचा गैरवापर करणे या कारणावरून मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या पथकाने गुलबर्गा दर्गाह संगणकीकृत तिकीट कार्यालयावर धाड टाकली. या कारवाईत चार अनधिकृत एजंटांना अटक करून त्यांच्याकडील २४ आरक्षण तिकिटे जप्त करण्यात आली. मंगळवारी ही मोहीम पार पडली.
मध्य रेल्वे सोलापूर विभागात रेल्वे प्रशासनाने रेल्वे आरक्षण केंद्रात अनधिकृत एजंटांद्वारे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुशील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखली आहे. सहा. वाणिज्य प्रबंधक आय. भास्कर राव यांनी मंगळवारी गुलबर्गा दर्गाह संगणकीकृत तिकीट कार्यालयावर अचानक धाड टाकली.