Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 02, 2013 - 15:00:25 PM


Title - शटल लवकरच परभणीपर्यंत
Posted by : puneetmafia on Jun 02, 2013 - 15:00:25 PM

औरंगाबाद

जालना ते नगरसोल रेल्वेला मनमाडपर्यंत जाण्यातील अडचणी ध्यानात घेऊन आता ही रेल्वे मनमाडऐवजी परभणीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे . त्यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि पूर्णा जक्शंन येथून इंधन भरणेही शक्य होणार आहे . ही रेल्वे परभणीपर्यंत नेण्याचा प्रस्तावाला दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी गुणशेखरन यांनी सहमती दर्शविली आहे . प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याचे येणार आहे .

जालना ते नगरसोल ही शटल रेल्वे सेवा फक्त जालना ते औरंगाबाद आणि पुढे रोटेगाव , पोटूळ या गावांच्या प्रवाशांसाठी वापरली जाते . या शटल रेल्वेचा प्रवाशांना अधिक उपयोग व्हावा , यासाठी थेट परभणी ते नगरसोल अशी शटल सेवा चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी संघटनेने केली होती . या मागणीचा ' मटा ' ने पाठपुरावा केला होता .

सध्या केवळ इंधन भरण्यासाठी शटल रेल्वे मनमाडपर्यंत जाते . तेथे प्रवासी भरण्यासाठीची जागा उपलब्ध होत नाही . त्यामुळे ही शटल मनमाडऐवजी परभणीपर्यंत नेल्यास प्रवाशांची सोय होईल . त्याचबरोबर परभणी जवळच असलेल्या पूर्णा जंक्शन येथून इंधन भरणेही शक्य होणार आहे . औरंगाबाद रेल्वे स् ‍ थानकाच्या पाहणीसाठी दक्षिण मध्य रेल्वेचे वाणिज्यिय विभाग प्रमुख गुणशेखरन नुकतेच आले होते . त्यावेळी त्यांनी या मागणीबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत सहमती दर्शविली . याशिवाय नरसापूर - नगरसोल या रेल्वे नगरसोलहून संध्याकाळी सहा वाजता सोड ‌ ल्यास संध्याकाळी हैदराबादकडे जाणाऱ्या अंजिठा एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्यात मदत होणार आहे . त्याबाबतही प्रस्ताव पाठविण्याची माहिती त्यांनी दिली .

रेल्वेचे डब्बे वाढविणार

सध्या नांदेड ते मुंबई जाणारी तपोवन एक्स्प्रेस आणि नंदीग्राम एक्स्प्रेसवर प्रवासी भार वाढला आहे . या रेल्वेचे डब्बे लवकरच वाढविण्याबाबतही त्यांनी सहमती दर्शविली . याशिवाय जनशताब्दी रेल्वेतही डब्बे वाढविण्याचा प्रस्ताव त्यांनी मध्य रेल्वेशी चर्चा करून मंजूर करण्याबाबत सहमती दर्शविली .

रिक्षा सफर

मनमाड ते औरंगाबाद येण्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी रेल्वेचा इंधन खर्च करतात , सीसीएम गुणशेखरण हे प्रवाशांसोबत थ्री एसी टायरमध्ये प्रवास करून आले . दुपारपर्यंत रेल्वे आरक्षण आणि बुकिंगची तपासणी केल्यानंतर त्यांनी दुपारच्या जेवणासाठी रेल्वे विभागाच्या गाडीचा वापर केला नाही . ते रिक्षातून जेवणासाठी गेले .

अशीही माणुसकी

दुपारी तपोवन एक्स्प्रेसने परत जाताना लोकांची जागेसाठी होत असलेली धावपळ पाहून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला . सर्व प्रवाशांना उतरवून दुसऱ्या प्रवाशांना चढविले . अशा प्रसंगात टीसी काय करतात ? असाही जाब विचारला याशिवाय एका अपंग प्रवाशांना चढण्यासाठी मदत करून , रेल्वेची सेवा कशी असावी , याचा धडा आपल्या सहकाऱ्यांना दिला .