Indian Railways News => Topic started by Jitendar on May 13, 2012 - 06:00:27 AM


Title - फुकट्या प्रवाशांकडून 9 कोटींचा दंड वसूल
Posted by : Jitendar on May 13, 2012 - 06:00:27 AM

मुंबई - अनधिकृत व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून वर्षभरात तब्बल नऊ कोटी पाच लाख रुपये वसूल केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 88 टक्के अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

दुसऱ्याच्या नावे आरक्षित असलेल्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या 605 जणांवर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एक कोटी 89 हजार दंड, लगेज तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एक कोटी 15 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.