Indian Railways News => Topic started by eabhi200k on May 30, 2013 - 06:00:05 AM


Title - Nashikroad Panchwati Express Late - पंचवटीचे रडगाणे पुन्हा सुरू, दुरांतो एक्स्प्रेसमुळे रोज आर्धा ता
Posted by : eabhi200k on May 30, 2013 - 06:00:05 AM

नाशिकरोड - प्रवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे खासदार समीर भुजबळ यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर नियोजित वेळेत धावणारी पंचवटी एक्स्प्रेस गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 ते 30 मिनिटे उशिराने येत आहे. त्यामुळे प्रवाशांची झालेली सोय ‘नव्याचे नऊ दिवस’ ठरली आहे.

दुरांतो एक्स्प्रेसमुळे पंचवटीला उशीर होत असल्याने मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचे नियोजन बिघडत आहे. मंगळवारी पंचवटीचे नाशिकरोड स्थानकावर सकाळी 7.30 वाजता आगमन होऊन ती 7.33 वाजता रवाना झाली. दादरला 10.46 वाजता, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसला 11 वाजेच्या सुमारास पोहोचली.

कामगारांचीही गैरसोय
उशिराने धावणार्‍या पंचवटीमुळे इगतपुरी एमआयडीसीतील कारखान्यात जाणार्‍या कामगारांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे. दत्ताराम गोसावी, राजू सरोदे, प्रवासी

वेळ पाळत नाहीत
दुरांतो एक्स्प्रेसमुळे पंचवटीला होणारा उशीर टाळण्यासाठी जुलैपासून पंचवटीच्या वेळेत बदल करण्यात आला. त्यानुसार ती 7 वाजता येऊन 7.10 वाजता सुटणे अपेक्षित असताना वेळ पाळली जात नाही. कैलास बर्वे, अध्यक्ष, प्रवासी संघटना

नियोजन कोलमडले
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन नियंत्रण ठेवल्याने पंचवटी वेळेत धावत होती. त्यांची एप्रिलमध्ये बदली झाल्यानंतर पंचवटीचे नियोजन कोलमडले आहे. राजेश फोकणे, पदाधिकारी, पंचवटी प्रवासी संघटना