Indian Railways News => Topic started by railgenie on Jun 19, 2012 - 15:00:11 PM


Title - मेलचालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळला
Posted by : railgenie on Jun 19, 2012 - 15:00:11 PM

केळवेरोड व सफाळा रेल्वे स्टेशनांदरम्यान सोमवारी मुंबईकडे जाणाऱ्या अप लाइनवर रेल्वे रूळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबवून लागलीच स्टेशनमास्तर आणि वरिष्ठांना कळविले . या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या वेगवेगळया अडीच तासाहून अधिक काळ रेल्वे स्टेशनांवर अडकून पडल्या होत्या .

सोमवारी पहाटे ५ वा १२ मिनिटांनी सौराष्ट्र मेल पालघर रेल्वे स्टेशनातून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर १० मिनिटांत केळवेरोड ते सफाळा रेल्वे स्टेशनांदरम्यान गाडीचे चालक राजेथसिंग टोमर व त्यांचे सहायक रमेथचंद्र मिना यांना अप लाइनवर सिग्नल अचानक लाल दिसला आणि काही तरी घडल्याचा संशय आला . त्यांनी गाडी थांबवली . खाली उतरून पाहिले असता रूळाला तडा गेल्याचे आढळले . त्यांनी याबाबत वरिष्ठांना याबाबत कळवले .

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या अप ट्रॅक वरील गरीब रथ तसेच बलसाड तेज पॅसेंजर आणि फ्लाईंग राणी एक्सप्रेस या गाड्या वेगवेगळया रेल्वे स्टेशनांवर थांबवून ठेवण्यात आल्या . काही वेळानंतर डाऊन ट्रॅकवरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली . प्रत्यक्षात मात्र अप ट्रॅकवरून सकाळी ७ वा ५६ मिनिटांनी पहिली गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली