Indian Railways News => Topic started by Jitendar on Aug 14, 2012 - 04:00:08 AM


Title - ठाणे स्टेशनातील पुलाचे होणार स्वातंत्र्यदिनी-----ठाणे
Posted by : Jitendar on Aug 14, 2012 - 04:00:08 AM

ठाणे ,

ठाणे स्टेशनातील तिसऱ्या व १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीजचे काम अखेर पूर्ण झाले असून स्वातंत्र्यदिनी हा पूल प्रवाशांसाठी खुला होत आहे . रुंद पुलाअभावी ठाणे स्टेशनात लाखो प्रवाशांची दररोज होणारी रेटारेटी यामुळे थांबणार आहे . १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या पुलाचे उद् ‍ घाटन केले जाणार आहे .

ठाण्यातून दररोज ६ लाख प्रवासी ये - जा करतात . मात्र या स्टेशनात अवघे दोनच आणि तेही अरुंद पूल असल्याने प्रवाशांना गर्दीच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी किंवा स्टेशनला उतरल्यावर बाहेर पडण्यासाठी तब्बल १५ मिनिटांचा अवधी लागतो . गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकदा प्रवाशांचे खिसे कापले तसेच साखळी व मोबाइल चोरीच्या घटनाही ठाण्यात वाढल्या होत्या .

या पार्श्वभूमीवर खासदार संजीव नाईक यांनी या पुलासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला . त्यामुळे सुमारे १० महिन्यांपूर्वी या पुलाचे काम सुरू झाले . काम पूर्ण झाल्याने १५ ऑगस्ट रोजी हा पूल खुला होईल . त्यानंतर ६ मीटर रुंदीचे आणखी २ आणि ४ मीटर रुंदीचा एक असे नवे ३ फूट ओव्हर ब्रीज ठाण्यात होतील अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली .