Indian Railways News => Topic started by nikhilndls on Feb 26, 2013 - 15:00:38 PM


Title - गुलाबगंज स्टेशन जाळले, एक ठार-देश-Maharashtra Times
Posted by : nikhilndls on Feb 26, 2013 - 15:00:38 PM

गुलाबगंज स्टेशन जाळले, एक ठार Feb 26, 2013, 01.53PM IST   आर्टिकल प्रतिक्रिया

0

मटा ऑनलाइन वृत्त । गुलाबगंज

मध्य प्रदेशमधील गुलाबगंज रेल्वे स्टेशनवर दंगल झाली. धावत्या गाडीतून दोन मुले पडल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गुलाबगंज स्टेशन जाळले आणि रेल्वे कर्मचा-यांना मारहाण केली. यात रेल्वेच्या एका कर्मचा-याचा मृत्यू झाला असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

गुलाबगंज स्टेशनवर झालेल्या जाळपोळीनंतर दिल्ली-भोपाळ मार्ग बंद करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच दिल्ली-भोपाळ मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.