Indian Railways News => Topic started by Jitendar on Jul 07, 2013 - 16:00:07 PM


Title - सीएसटीच्या अठराव्या प्लॅटफॉर्मजवळ वाहनतळ
Posted by : Jitendar on Jul 07, 2013 - 16:00:07 PM

मुंबई

सीएसटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १८पर्यंत पोहोचताना प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वाहनतळ तसेच अन्य सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. वाडीबंदरमधील डिमेलो रोड येथे प्रशस्त वाहनतळ, खाद्यपदार्थांचे दोन स्टॉल्स, आसनव्यवस्था आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

सीएसटी स्टेशनच्या दुसऱ्या टोकाला असलेले हे प्लॅटफॉर्म सोबत सामान घेऊन गाठताना प्रवाशांची दमछाक होते. तिथे टॅक्सी स्टँडची सुविधा नसल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय होते. या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने वाहनतळ तसेच अन्य सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.