Indian Railways News => Topic started by messanger on Jul 07, 2013 - 18:00:43 PM


Title - लोहमार्गावर सहा महिन्यांत 184 प्रवाशांचा मृत्यू
Posted by : messanger on Jul 07, 2013 - 18:00:43 PM

पुणे - लोहमार्ग ओलांडताना पुणे विभागात गेल्या सहा महिन्यांत 184 प्रवाशांना जीव गमवावा लागला असून, 2,187 जणांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे.

लोहमार्ग ओलांडणे हा भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैदेची शिक्षा होऊ शकते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोहमार्ग ओलांडताना 184 जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी दिली. लोहमार्ग ओलांडण्यासाठी प्रवाशांनी पादचारी मार्गांचा वापर करावा, तसेच रेल्वेगाडीच्या डब्यात दरवाजात बसून प्रवास करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.