Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 07, 2013 - 18:00:45 PM


Title - रेल्वेसेवा पूर्ववत
Posted by : railgenie on Jul 07, 2013 - 18:00:45 PM

नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी देवगिरी एक्सप्रेस घसरल्याने नाशिकरोडहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली होती . ती शनिवारी पूर्ववत झाल्याने मुंबईकडे जाणा - या गाड्या वेळेवर धावत होत्या .

गुंडूर , सिकंदराबाद येथून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता इगतपुरी स्थानकाजवळील टिटोलीजवळ आली असता तिच्या इंजिनाच्या पुढील भागातील एक मोठा रॉड अचानक निखळल्याने रेल्वेचे रूळ तुटले . यामुळे इंजिनसह एक डब्बा रुळावरून घसरला . या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही . मात्र मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते . मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले . रेल्वे प्रशासनाने या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी इगतपुरी स्थानकावरून व्यवस्था केली . या अपघातामुळे अनेक गाड्या आहे त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या तर काही पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या .

दरम्यान , एक्स्प्रेस वेगात असल्याने तब्बल २४ ठिकाणी रेल्वेच्या रुळाला जागोजागी तडे गेल्याची माहिती प्रशासनाने दिली . अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला समजताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले . नाशिक व भुसावळहून तातडीने मदतकार्य सुरू झाल्याने शनिवारी वाहतूक पूर्ववत झाली . किरकोळ काम बाकी असल्याने व पावसाच्या व्यत्ययाने काम करण्यात अडथळा येत होता