Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 07, 2013 - 18:00:19 PM


Title - रेल्वेला सहलींमुळे 87 कोटींचे उत्पन्न
Posted by : riteshexpert on Jul 07, 2013 - 18:00:19 PM

पुणे - सुरक्षितता, किफायतशीर दर व विश्‍वास यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) काढण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सहलींना चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन वर्षांत या विभागाची उलाढाल सहा कोटींवरून 87 कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल हिमालियन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आयआरसीटीसीतर्फे दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहली काढण्यात येत आहेत. सध्या सिंगापूर, दुबई, थायलंड, बॅंकॉक आदी ठिकाणच्या सहली काढण्यात येत असल्या तरी पुढच्या टप्प्यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, दक्षिण आफ्रिका आदी देशांत सहली काढण्याचे नियोजन आहे. सहलींचे दर किफायतशीर असल्यामुळे मध्य प्रदेश सरकारने करार केला आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी सहली काढण्यात येत आहेत. त्याचे पैसे राज्य सरकार देते. त्या नागरिकांची यादी रेल्वेला मिळते. त्यानुसार त्यांना सहलीला नेले जाते. हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानमध्ये राबविण्यात यावा, यासाठी आयआरसीटीसी प्रयत्नशील असल्याचे हिमालियन यांनी सांगितले.

पुण्यातून चांगला प्रतिसाद
"आयआरसीटीसीतर्फे 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान दुबईत व पुढील आठवड्यात थायलंडला सहल काढण्यात येत आहे. तिला विशेषतः पुण्यातून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 16 ते 20 ऑक्‍टोबरला पुन्हा थायलंडला सहल काढण्यात येणार असून पर्यटन विश्‍वातील सर्वांत स्वस्त व चांगल्या प्रकारच्या सुविधा देणाऱ्या या सहली आहेत, तसेच दक्षिण भारत दर्शन ही दहा दिवसांची सहल काढण्यात येत असून, तिचाही दर सर्वांत कमी आहे, असे हिमालियन यांनी नमूद केले. "आयआरसीटीसी' ही केंद्र सरकारची संस्था असल्यामुळे अवघ्या साडेबारा टक्के नफ्यावर कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले.