Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 08, 2013 - 12:00:38 PM


Title - औरंगाबाद ते पंढरपूर ' अशी विशेष रेल्वे
Posted by : Mafia on Jul 08, 2013 - 12:00:38 PM

औरंगाबाद

आषाढी एकादशीनिमित्त भक्तांच्या आग्रहास्तव दक्षिण मध्य रेल्वेने ' औरंगाबाद ते पंढरपूर ' अशी विशेष रेल्वे सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे . या रेल्वेची घोषणा केली तेव्हा , दहा डब्यांची रेल्वे घोषित करण्यात आली होती . मात्र , यात्रेकरूंचा प्रतिसाद बघता चार डबे आणखी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

' औरंगाबाद ते पंढरपूर ' ही विशेष रेल् ‍ वे १७ जुलैला औरंगाबाद रेल् ‍ वे स् ‍ थानकावरून रात्री ८ . ३० वाजता सोडविली जाणार आहे . ही रेल्वे १८ जुलैला पंढरपूरला पोहोचेल . १८ जुलैला रात्री दहा वाजता पंढरपूराहून निघेल आणि औरंगाबादला दुसऱ्या दिवशी पोहोचेल . ही रेल्वे जालना , परतूर , सेलू , मानवत रोड , परभणी , गंगाखेड , परळी वैजनाथ , उस्मानाबाद , बार्शी , कुर्डूवाडीमार्गे पंढरपूरला जाणार आहे . ही रेल्वे चौदा डब्याची असून स्लीपरचे चार डबे आणखी वाढविण्यात आले असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी दिली .

या रेल्वेतून पंढरपूर यात्रेसाठी जनरल तिकिटाचे दर १४० रूपये असून , स्लीपरचे तिकिट २७० रूपये राहणार असून , रेल्वेला १७ जुलै रोजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली .