Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Nov 09, 2012 - 16:00:23 PM


Title - do your engineering carrier with indian railway - इंजिनिअरिंगचे स्वप्न साकार करेल रेल्वे!
Posted by : ConfirmTicket on Nov 09, 2012 - 16:00:23 PM

जळगाव - नोकरी करीत असतानाच मॅकेनिकल इंजिनिअर बनण्याचे स्वप्न भारतीय रेल्वे पूर्ण करणार आहे. यासाठी यूपीएससीच्या माध्यमाने भारतीय रेल्वे 20 जानेवारी रोजी अँपरेंटीस एक्झाम आयोजित करणार आहे. या परीक्षेत 12 वी पास विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. परीक्षेत टॉप 42 रॅँक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वे खात्यात मॅकेनिकल इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळणार आहे.

पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पहिल्या दोन वर्षांसाठी महिन्याला 9100 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तर तिसर्‍या आणि चौथ्या वर्षाला पहिल्या सहा महिन्यांसाठी 9400 आणि शेवटच्या सहा महिन्यांसाठी 9700 रुपये दिले जाणार आहे. डिग्री प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वेत मॅकेनिकल इंजिनिअर पदावर काम करण्याची संधी मिळेल. परीक्षेत सहभागी होण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

अशी आहे पात्रता - या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी गणित या विषयात इंटरमिजिएटच्या परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय र्शेणीत उत्तीर्ण असावा. 12 वीत असलेले विद्यार्थीही सहभाग घेऊ शकणार आहेत. तसेच 1 जानेवारी 2013 पर्यंत 17 ते 21 या वर्षे वयोगटातील विद्यार्थीच परीक्षा देऊ शकतील.

अर्ज करण्यासाठी - या परीक्षेत सहभागी होण्यासाठी upsc.gov.in रवेबसाइटवर माहिती उपलब्घ आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी upsconline.nic.inवर अर्ज उपलब्ध आहे. याशिवाय विद्यार्थी सोयीसाठी 011-233852711 आणि 23381125 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

दोन परीक्षेनंतर पात्रता - ही परीक्षा दोन टर्ममध्ये हाईल. पहिल्या टर्ममध्ये 600 गुणांचे 3 लेखी पेपर होतील. दुसर्‍या टर्ममध्ये 200 गुणांची पर्सनालिटी टेस्ट होईल. लेखी परीक्षेच्या एका पेपरसाठी दोन तासांची वेळ देण्यात आली आहे. यात अँबिलिटी टेस्ट फिजिकल सायन्स आणि मॅथचे पेपर आहे. सर्व प्रo्न ऑब्जेक्टिव्ह आणि इंग्रजी भाषेत असतील. अँबिलिटी टेस्टमध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि सायकॉलॉजी विषयांशी संबंधित प्रo्न असतील.

ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू - भारतीय रेल्वेने 12वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे अँप्रेंटिस एक्झाम (एससीआरए 2013) घेत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षार्थींनी 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. रवि कुमार, पीआरओ, उत्तर मध्य रेल्वे