Indian Railways News => Topic started by Jitendar on Jan 17, 2013 - 15:00:15 PM


Title - २४ पासून प्लॅटफॉर्म नं. १ खुला
Posted by : Jitendar on Jan 17, 2013 - 15:00:15 PM

Extended Platform No-1 at Solapur Station to open from 24 Jan. It will accomodate 24 coach trains.

२४ पासून प्लॅटफॉर्म नं. १ खुला



२ कोटी रुपये खचरून प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या येण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या उत्पन्नात भर तर पडणारच आहे. शिवाय प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.
- सुशील गायकवाड
वरिष्ठ रेल्वे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर। दि. १६ (प्रतिनिधी)
सोलापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, २४ जानेवारीपासून हा प्लॅटफॉर्म खुला होणार आहे.
पूर्वी या प्लॅटफॉर्मची लांबी ४२0 मीटर इतकी होती. आता विस्तारीकरणानंतर तिची लांबी ५५0 मीटर इतकी वाढवण्यात आली आहे. केवळ १८ बोगीच्या गाड्यांनाच प्लॅटफॉर्मवर थांबा मिळत होता. लांब पल्ल्याच्या गाड्या सोलापूर स्थानकावर याव्यात. जेणेकरून इथल्या प्रवाशांना सुविधा मिळाव्यात या हेतूने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ऑक्टोबर-२0११ मध्ये विस्तारीकरणाचा प्रस्ताव पाठवला. रेल्वे मंत्रालयाने तातडीने त्यास मंजुरी दिली. त्यानंतर सोलापूर विभागाने १0 डिसेंबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद ठेवून विस्तारीकरणास सुरुवात केली. तब्बल ४५ दिवस बंद ठेवून प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे विस्तारीकरण करण्यात आले.
ट्रॅकची लांबी वाढवणे, रुळ टाकणे आणि सिग्नल यंत्रणेची जागा बदलणे आदी प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. आता किरकोळ कामे सुरू असून, २२ जानेवारीपर्यंत ही सगळीच कामे मार्गी लागणार आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद असल्याने प्रवाशांना होणारा त्रास आता २४ जानेवारीपासून कमी होणार आहे.