Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jan 18, 2013 - 15:00:13 PM


Title - लोकल पास सहामाही, वार्षिकही
Posted by : eabhi200k on Jan 18, 2013 - 15:00:13 PM

१८ आणि ३७ दिवसांचा प्रवास मिळणार मोफत

म. टा. प्रतिनिधी , मुंबई

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने खूषखबर दिली असून यापुढे सहा महिन्यांचा किंवा वर्षभराचाही पास काढणे लोकल प्रवाशांना शक्य होणार आहे. आणखी आनंदाची बातमी म्हणजे वर्षाचा पास काढल्यास ३७ दिवसांचा आणि सहा महिन्यांचा पास काढल्यास १८ दिवसांचा प्रवास प्रवाशांना मोफत मिळणार असून महिना-तीन महिन्यांनी पाससाठी रांगेत उभे राहण्याची कटकटही मिटणार आहे. ही योजना १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

लोकलप्रवाशांवर नुकताच कोसळलेला भाडेवाढीचा भार कमी करण्यासाठी रेल्वेने ही सहामाही आणि वार्षिक पासाची योजना आणली आहे. देशभरातील सर्वच लोकलसेवांना ती लागू होईल.

सध्या सेकंड क्लासच्या पाससाठी तिकिटाच्या सहा पट आणि फर्स्ट क्लासच्या पाससाठी तिकिटाच्या बारा पट भाडे आकारले जाते. नव्या पास योजनेत सहा ऐवजी ५.४ पट आणि बाराऐवजी १०.८ पट इतकेच भाडे आकारले जाणार असल्याने सहामाही पास काढल्यास १८ आणि वार्षिक पास काढल्यास ३७ दिवसांचा प्रवास मोफत देणे रेल्वेला शक्य होणार