Indian Railways News => Topic started by railgenie on Jan 23, 2013 - 18:00:14 PM


Title - रेल्वे तिकीट खिडक्‍यांवरील सुट्यांच्या कटकटीला विराम
Posted by : railgenie on Jan 23, 2013 - 18:00:14 PM

नाशिक रोड- रेल्वेच्या तिकीट दरातील वाढीला आजपासून सुरवात झाली. रेल्वेभाड्यात पाच रुपयांच्या पटीत वाढ केल्याने रोज पहाटे साडेचारपासून सुरू होणाऱ्या सुट्या पैशांच्या कटकटीला आज पहिल्याच दिवसापासून ब्रेक लागला. रेल्वेच्या तिकीट खिडक्‍यांवरील सुट्या पैशांच्या वादाने सुरू होणारा प्रवास रात्री तिकीट खिडकी बंद होईपर्यंत चालत असे. त्याला आता विराम मिळाला आहे.

रेल्वेच्या तिकीट दरातील वाढ वरकरणी किलोमीटरला पाच ते सहा पैसे वाटत असली तरी त्याचा पाचच्या पटीमुळे हा फटका मोठा आहे. रेल्वे तिकीट प्लॅटफॉर्मसह सर्वांत कमी तिकीट भाडे पाच रुपये आहे. त्यानंतर दहा, पंधरा, वीस अशा पाच रुपयांच्या पटीतच आकारणी होणार आहे. याशिवाय अर्धे तिकीट किंवा सवलतीचे तिकीट आकारणीतही पाचच्या पटीतच फटका सोसावा लागणार आहे. उदाहरणार्थ, वयस्क व्यक्तीचे तिकीट 35 रुपये असल्यास पूर्वी अर्धे तिकीट 17.50 पैसे असे. आता हेच तिकीट थेट वीस रुपये असेल. त्यामुळे हा पाच रुपयांच्या पटीचा महिमा रेल्वेच्या तिजोरीत मोठा महसूल देण्यात हातभार लावणार आहे.

-रेल्वेची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीत
-त्रैमासिक भाड्यात 0.25 टक्‍क्‍याची सवलत
-फेब्रुवारी, मार्च, ऑगस्ट महिने "स्लॅक सीझन'
-युवा ट्रेन, शताब्दीसह गाड्यांचे वर्गीकरण
-तीनऐवजी पाच रुपयांनी भाडे आकारणी सुरू

नाशिक रोडहून देशातील व राज्यातील प्रमुख शहरांचे भाडे (कंसात जुने भाडे)

स्थानक स्लीपर थ्री एसी सेकंड एसी प्रथम वर्ग एसी

मुंबई (सीएसटी) 155 (140) 475 (339) 655 (640) 1110 (1080)
कोलकता (हावडा) 590 (481) 1535 (1344) 2235 (2125) 3835 (3680)
नवी दिल्ली 500 (414) 1295 (1150) 1875 (1790) 3225 (3085)
भोपाळ 325 (282) 835 ( 764) 1180 (1140) 2010 (1940)
जम्मू 625 (504) 1620 (1414) 2365 (2245) 4095 (3890)
नागपूर 325 (282) 835 (764) 1180 (1140) 2010 (1940)
भुसावळ 180 (160) 475 (408) 655 (640) 1110 (1080)
औरंगाबाद 135 (120) 445 (408) 625 (610) 1060 (1030)