Indian Railways News => Topic started by riteshexpert on Mar 08, 2013 - 18:00:39 PM


Title - मध्य रेल्वेवर कटकट वाढली
Posted by : riteshexpert on Mar 08, 2013 - 18:00:39 PM

सुशांत मोरे। दि. ७ (मुंबई)
दोन दिवसांपूर्वी कपड्यांचे गाठोडे रुळावर पडल्यामुळे हार्बर विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. जानेवारी महिन्यापासून हार्बर आणि मेन लाइन या-ना त्या कारणाने वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना नसती कटकट सहन करावी लागत आहे. जानेवारी २0१३ ते मार्चपर्यंत मेन लाइन २९ वेळा तर हार्बर लाइन १७ वेळा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
जानेवारी २0१३ उजाडताच मध्य रेल्वे मार्गावर पॉइंट फेलियर, पेन्टाग्राफ तुटणे, लोकलचे डबे रुळावरून घसरणे, मेल-एक्स्प्रेस किंवा मालगाडीचे इंजीन बंद पडणे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना मोठय़ा प्रमाणात होत आहेत.
सकाळी कामावर जाताना आणि कामावरून घरी परतताना ऐन गर्दीच्या वेळी अशा घटना होत असल्याने प्रवाशांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. मेगाब्लॉक घेऊन ओव्हरहेड वायर, पेन्टाग्राफ, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची कामे हाती घेतली
जातात.
मात्र, तरीही बोजवारा उडण्याच्या घटना वारंवार होत असल्याने या घटना थांबतील कधी, असा सवाल प्रवाशांकडून वारंवार उपस्थित केला जातोय.
जानेवारी २0१३ ते ५ मार्च २0१३ पर्यंत हार्बर लाइन १७ वेळा विस्कळीत झाली आहे तर मेन लाइन तब्बल २९ वेळा विस्कळीत झाली आहे.
त्यामुळे मेगाब्लॉक घेऊनही करण्यात येणार्‍या कामांबाबत आता प्रश्न उभे राहात आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांच्याशी संपर्क
साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

विस्कळीत हार्बर
११ जानेवारी खार रोड येथे पॉइंट फेलियरची घटना.
२0 जानेवारी वाशी-मानखुर्दला पेन्टाग्राफ तुटला.
२६ जानेवारी किंग्ज सर्कलला चाकात लोखंडी तुकडा.
१ फेब्रुवारी सॅण्डहस्र्ट रोड येथे लोकलचा ब्रेक जाम.
९ फेब्रुवारी ऐरोली येथे लोकलचे डबे घसरले.
२५ फेब्रुवारी ठाणेत लोकलचा पेन्टाग्राफ तुटला.
विस्कळीत सेंट्रल
७ जानेवारी ठाणेजवळ मालगाडीचा पेन्टाग्राफ तुटला.
१९ जानेवारी आसनगाव येथे शिर्डी
साईनगर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड.
२0 फेब्रुवारी अंबरनाथ येथे ओव्हरहेड वायर तुटली.
२१ फेब्रुवारी शहाड येथे ओव्हरहेड वायर तुटली.
२२ फेब्रुवारी अंबरनाथ येथे लोकलचा पेन्टाग्राफ तुटला.