Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 07, 2012 - 18:00:26 PM


Title - मध्य रेल्वे विस्कळित
Posted by : irmafia on Jun 07, 2012 - 18:00:26 PM

कल्याण - मुंबई सीएसटीहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्याने आज सायंकाळी मध्य रेल्वेची कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.

सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान लोकलचा पेंटोग्राफ तुटला. त्यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अनेक प्रवाशांना कल्याण स्थानकातून रिक्षा पकडून घर गाठावे लागले. रात्री उशिरा रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.