Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jan 22, 2013 - 15:00:07 PM


Title - धावत्या रेल्वे गाडीतून फेकले
Posted by : nikhilndls on Jan 22, 2013 - 15:00:07 PM

नागपूर । म.टा. विशेष प्रतिनिधी

धावत्या जीटी एक्सप्रेसमधून पेंट्री कारच्या कर्मचाऱ्याला फेकण्याची घटना आज सकाळी आमला नजीक घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १९ रोजी चेन्नई-दिल्ली जीटी एक्सप्रेसमध्ये पेंट्री कार कर्मचारी व खासगी खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यात भांडण झाले होते. आज ही गाडी दिल्लीवरून परत येत असताना सकाळी ९ वाजता धाराकोह स्थानकावर ५-६ जण गाडीत चढले व पेंट्री कारचे मॅनेजर सुरेश सीताराम सिंग यांच्याशी वाद घालू लागले. वाद वाढत असल्याचे पाहून पेंट्री कारमधील कर्मचारी राम बरम हा मध्यस्थी करण्यासाठी आला. त्यावेळी गाडीत चढलेल्या या लोकांनी राम बरम याला उचलून गाडीच्या बाहेर फेकून दिले. घाबरलेल्या सुरेश सिंग यांनी लगेच साखळी ओढून गाडी थांबवली. त्याबरोबर राम बरमला फेकणारे पळून गेले. या घटनेत बरम गंभीर जखमी झाला. त्याला आमला येथील रेल्वे इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आमला लोहमार्ग पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.