Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jan 28, 2013 - 09:00:52 AM


Title - तिरुपतीकडे जाणाऱ्या दोन रेल्वेच्या मार्गांत बदल
Posted by : nikhilndls on Jan 28, 2013 - 09:00:52 AM

पुणे - आंध्र प्रदेशातील गुंटकूल स्थानकांतर्गत ताडीलपत्री व राऊलचेरूदरम्यान लोहमार्गाच्या देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. 28) दोन रेल्वेच्या मार्गांत बदल होणार आहेत. त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मुंबई-कन्याकुमारी एक्‍स्प्रेस गुंटकूलहून गुटी, धर्मावरम व बंगळूरहून नियोजित स्थळी पोचणार आहे. येतानाही बंगळूर, धर्मावरम व गुटीमार्गे गुंटकूलहून ती नेहमीच्या मार्गावरून मुंबईकडे जाईल. हा बदल 27 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान असेल. मुंबई-नागरकोईल बालाजी एक्‍स्प्रेस गुटी, धर्मावरम, पकाला, तिरुपतीमार्गे रेणुगुंटा येथे जाणार आहे. येताना तिरुपती, पकाला, धर्मावरममार्गे गुटीवरून गुंटकूलला येईल. सात फेब्रुवारीपर्यंत या गाडीच्या मार्गात बदल असेल, असे मध्य रेल्वेच्या पुणे कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी कळविले आहे.