Indian Railways News => Topic started by TrustMe on May 17, 2013 - 18:00:41 PM


Title - अंकाई ते लासूर रेल्वे ट्रॅकची होणार दुरूस्ती
Posted by : TrustMe on May 17, 2013 - 18:00:41 PM

औरंगाबाद

अंकाई ते लासूर रेल्वे ट्रॅकची सुरक्षीतता वाढविण्यासाठी लवकर रेल्वे ट्रॅकच्या मजबुतीकरणाचे रेल्वे स्पिलर बदलण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. रेल्वे रूळाच्या स्लिपर बदलण्यात येणार असून यासाठी दौलताबाद येथे स्पेशल डेपो तयार करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवीप्रसाद पांडे यांनी मनमाड ते नांदेडपर्यंत रेल्वे ट्रॅकची पाहणी केली होती. या पाहणीत अंकाई ते लासूर या मार्गावर रेल्वे ट्रॅकचे काम करण्याची सूचना देण्यात आली होती. याशिवाय या रेल्वे ट्रॅकच्या २५ किलोमीटरच्या रेल्वे स्लिपर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी स्पेशल क्रेन आणण्यात आली आहे.

अंकाई ते लासूर या रेल्वे ट्रॅकच्या स्लिपरचे काम करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनिल सिंह सोईन यांनी दौलताबाद डेपोला भेट दिली. या भेटीत त्यांनी रेल्वे स्पीलर बदल्याच्या कामाच्या तयारी बाबत माहिती घेतली. या डेपोत स्पिलर बदलण्याच्या कामासाठी स्पेशल ‌क्रेन आणण्यात आली आहे. या क्रेनच्या सहाय्याने सदर स्पिलर बदलण्याचे काम केले जाणार आहे.

या स्पेशल क्रेनच्या सहाय्याने दररोज काही किलोमीटरचे रेल्वे स्लिपर बदल्याचे काम केले जाणार आहे. या क्रेनमध्ये रूळ हटविण्यापासून नवीन स्लिपर आणि रूळ टाकण्यापासून ते रूळाखाली गट्टी टाकूण लेव्हल करण्यापर्यंतची सर्व कामे केली जातात. चोवीस किलोमीटरच्या स्लीपर बदलण्याचे काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यापेक्षा जास्त अवधी लागणार आहे.

तीन तासाचा ब्लॉक घेण्याची तयारी

अंकाई ते लासूरपर्यंत रेल्वे रूळाच्या स्पिलर बदलण्याचे काम आगामी दहा दिवसात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या कामासाठी किती वेळ मेगाब्लॉक घ्यायचा आहे. या विषयी चर्चा करण्यात आली. अंकाई ते लासूर रेल्वे रूळाच्या कामामुळे औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते दिल्लीसह मनमाडकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यासाठी तीन तासांचा ब्लॉक सलग घेण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.