| Indian Railways News => | Topic started by messanger on Dec 09, 2012 - 03:02:23 AM |
Title - Railway DRM visit to Nashik road railway station - रेल्वे महाप्रबंधकांच्या दौर्यात कामे केल्याचा देPosted by : messanger on Dec 09, 2012 - 03:02:23 AM |
|
|
नाशिकरोड- मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या दौर्यात सर्वत्र रंगरंगोटीसह कामे पूर्ण केल्याचाच देखावा दिसून आला. रेल्वेस्थानक, ट्रॅक, सिग्नल, सुविधा आदी बाबींची तपासणी दरवर्षी केली जाते. यंदाच्या तपासणीचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाल्यापासून इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या स्थानकावरील अधिकारी, कर्मचारी धास्तावलेले होते. महाप्रबंधक सुबोध जैन यांच्याकडून तपासणीनंतर शाबासकी मिळावी यासाठी सर्व स्तरांतून प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. स्थानकावरील डागडुजी, रंगरंगोटी, ठिकठिकाणी दुरुस्ती, लाइट, माहिती फलक, उड्डाणपुलाची दुरुस्ती, रंगरंगोटी याशिवाय कामात सुधारणा करण्यात आली होती. स्थानकाला नववधूसारखे सजविण्यात आले होते. रांगोळी, फुलांची तोरणे लावण्यात आली. अपेक्षेनुसार महाप्रबंधक जैन यांनीही या वरवरच्या सुधारणा, सुविधा, वातावरण व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि ते निर्धास्त होऊन परतले. |