Indian Railways News => | Topic started by nikhilndls on Aug 13, 2012 - 18:00:20 PM |
Title - : येणार 5 नव्या रेल्वे गाड्या, पीटलाइनचे काम लवकरच पूर्णत्वास जाणारPosted by : nikhilndls on Aug 13, 2012 - 18:00:20 PM |
|
सोलापूर - मध्य रेल्वेमध्ये उत्कृष्ट सेवा आणि उत्पन्न मिळवून देण्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या सोलापूर विभागाला पाच नव्या रेल्वे गाड्या उपलब्ध होत आहेत. स्थानकावरील पीटलाइनचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ही शक्यता बळावली आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्याही वाढणार आहे. पीटलाइन ऑक्टोबरपासून कार्यान्वित होईल. यामुळे सोलापूर रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. |