Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jul 24, 2013 - 08:59:57 AM


Title - - नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी: जम्मू व अहमदाबादसाठी रेल्वेचा प्रस्ताव
Posted by : eabhi200k on Jul 24, 2013 - 08:59:57 AM

नाशिकरोड - मुंबईहून नाशिकमार्गे जम्मू व अहमदाबादला जाण्यासाठी एकही रेल्वे नसल्याने नाशिक जिल्ह्यातील भाविक व प्रवाशांना मुंबई येथून जावे लागते. नाशिक येथून या ठिकाणांसाठी होणारे आरक्षण, तिकीट विक्री लक्षात घेऊन नाशिकमार्गे या दोन नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. भाविक पुणे येथून सुटणार्‍या मनमाडमार्गे धावणार्‍या जम्मू तावी (झेलम) गाडीने जातात. मुंबईच्या भाविकांना जम्मू तावी (स्वराज) गाडीची सोय आहे. या दोन्ही गाड्या वर्षभर हाऊसफुल असतात. जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मुंबईहून नाशिकमार्गे जम्मूसाठी नवीन गाडी सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. अहमदाबाद, सुरतसाठी नाशिकमार्गे गाडी नसल्याने प्रवाशांना मुंबईला जावे लागते. त्यामुळे वेळ अधिक खर्च होतो. त्यामुळे मुंबईहून नाशिकमार्गे मनमाड, जळगाव, नंदुरबारमार्गे अहमदाबाद गाडी सुरू करण्याचा प्रस्तावात समावेश आहे.

‘निजामुद्दीन’ची अद्याप प्रतीक्षाच मध्य रेल्वेने अतिजलद वातानुकूलित लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते निजामुद्दीन (क्रमांक-22109/22110) नवीन गाडीच्या शुभारंभाची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. अतिजलद, संपूर्ण वातानुकूलित एकमेव व दोन्ही बाजूने केवळ सहा थांब्यांच्या गाडीचे जोरदार स्वागत होत आहे. धावण्याच्या दिवसांची संख्या वाढवून लवकर शुभारंभाची मागणी प्रवाशांनी केली आहे.

महसूल वाढेल रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता जम्मू, अहमदाबादसाठी नाशिकमार्गे गाडी सुरू झाल्यास मध्य रेल्वेच्या नाशिक स्थानकाच्या महसुलात निश्चितच लक्षणीय वाढ होईल. सचिन गडाख, प्रवासी