| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Jul 24, 2013 - 09:01:02 AM |
Title - - नांदेडसह 3 स्थानके उडवण्याची धमकी, ‘आयबी’च्या इशार्यांनंतर खडा पहाराPosted by : riteshexpert on Jul 24, 2013 - 09:01:02 AM |
|
|
नांदेड - दहशतवादी अफझल गुरू आणि अजमल कसाबला फासावर लटकावल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून 21 जुलै रोजी नांदेड, भुसावळ आणि जळगाव स्थानकांसह राज्यातील इतर सात ठिकाणी घातपात घडवला जाऊ शकतो, असा सुगावा गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाला लागला आहे. त्यापाठोपाठ नागपूर येथील लोहमार्ग पोलिस अधीक्षकांना त्यांनी शुक्रवारी रात्री सतर्कतेच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर नांदेडसह तिन्ही स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बॉम्बशोधक, श्वान पथकाद्वारे ठिकठिकाणी तपासणीसह पोलिस आणि आरपीएफच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नांदेडात चार प्लॅटफॉर्म असून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तीन पोलिस असा पहारा ठेवण्यात आला आहे. दिवसात दोनदा श्वानपथकाकडून तपासणी सुरू आहे. 20 सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे हालचालींवर लक्ष आहे. निरीक्षकासह 45 पोलिस या ठिकाणी आहेत. 15 पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) 43 जवानांची मदत घेण्यात येत आहे. रेल्वेचे पोलिस निरीक्षक प्रशांत संपते यांनी ही माहिती दिली. |