Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 26, 2013 - 21:00:45 PM


Title - ...त्याने वाचविले हजारोंचे प्राण - रुळ होते अधांतरी : नीलेशच्या सतर्कतेने रेल्वेगाड्या थांबल्या
Posted by : puneetmafia on Jul 26, 2013 - 21:00:45 PM

प्रशांत कलोडे सिंदी (रेल्वे)
१९ जुलैचा तो दिवस.. मुसळधार पाऊस सुरू होता, नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. सिंदीनजीक रेल्वे रूळाखालील गिट्टी व माती पूर्णत: वाहून गेली. रूळ तरंगत होते.. हे दृश्य अंधारात मोबाईलच्या प्रकाशात रेल्वेरूळाचाच रस्ता धरत घर गाठणार्‍या निलेश ढोबळे नामक तरुणाने बघितले आणि त्याच्या काळजाचा थरकाप उडाला.
अपलाईनवर अहमदाबाद एक्स्प्रेस व डाऊन लाईनवर पटना एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना ग्रीन सिग्नल होता. प्रसंगावधान राखत त्याने क्षणाचाही विलंब न लावता रेल्वेच्या कर्मचार्‍यांना याबाबत माहिती दिली. तत्काळ दोन्ही बाजूच्या रेल्वेस्थानकांवर सूचना पोहोचली आणि गाड्या जागच्या जागी थंबविण्यात आल्या. मोठा अनर्थ टळला. ज्याने शेकडो प्रवाशांचा जीव वाचविला तो नीलेश पडद्यामागचा हिरो ठरला आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्याला कौतुकाची थाप मिळाली नसली तरी आपण देशासाठी काही करू शकलो, याचे समाधान त्याला सुखावून जाते.
रूळाखालील माती, गिट्टी वाहून जाण्याच्या काही वेळेपूर्वी अप मार्गावरून दक्षिण एक्स्प्रेस व डाऊन मार्गावरून अमरावती-नागपूर लोकल गेली होती. लोकलमधून नीलेश रामभाऊ ढोबळे रा. पिपरा हा युवक सिंदी रेल्वेस्थानकावर उतरला.